Updates

दावा

नोंदणीची पद्धती

  • स्थानिक पातळीवरील दावे
  • कापणीनंतरचे दावे

दावा

सूचना: स्थानिक आपत्ती आणि कापणीनंतरच्या नुकसानीचे नुकसान/हानीचे वैयक्तिक विमा उतरवलेल्या शेतपातळीवर मूल्यमापन केले जाईल आणि म्हणून शेतकऱ्याने /नियुक्त एजन्सीद्वारे नुकसानीची माहिती नोंदविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत दाव्याची माहिती कळवावी.

दाव्याची माहिती कशी द्यावी: शेतकऱ्यांनी याद्वारे दाव्याची माहिती कळवावीः
  1. विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक 1800 209 1111
  2. संबंधित बँकेची शाखा
  3. स्थानिक कृषी विभाग
  4. शासकीय जिल्हा अधिकारी
  5. शासकीय पीक अॅप्लिकेशन

सर्वेक्षकाची नेमणूक: शेतकऱ्याने माहिती कळविल्यापासून ४८ तासांच्या आत विमा कंपनी सर्वेक्षकाची नेमणूक करेल.

दाव्याचा हिशोब: जिल्हास्तरीय संयुक्त समिती (डीएलआयसी) द्वारा सादर करण्यात आलेल्या नुकसान मूल्यमापन अहवालानुसार आणि/किंवा संबंधित राज्य सरकारने सादर केलेल्या सरासरी उत्पन्नाच्या माहितीनुसार विमा कंपनी द्वारा दाव्याचा हिशोब करेल.

दाव्यांचे वितरण: शेतकर्‍याची प्रीमियमची रक्कम आणि सरकारी अनुदान मिळण्याच्या अधीन राहून सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांचे आत दाव्याचा व्यवहार पूर्ण केला पाहिजे.

वैयक्तिक दावे