Updates

PMFBY Enrolment Process for New Farmer

चॅनल्स

  • सहकारी - बँका
  • सीएससी-व्हीएलईसेंटर्स
  • पोस्टाचे कार्यालय
  • अधिकृतमाध्यम
  • पीएमएफबीवाय पोर्टल

नोंदणीची पद्धती

कर्जदार शेतकरी

व्याख्येत समाविष्ट वित्तीय संस्थांकडून अधिसूचित पिकांसाठी अल्प-मुदतीच्या हंगामी शेतकामासाठी (एसएओ) कर्ज/ केसीसी (किसान क्रेडिट कार्ड) मंजूर केलेले सर्व शेतकरी. वित्तीय संस्थांद्वारा एनसीआयपीच्या पोर्टल द्वारा शेतकऱ्यांची नावनोंदणी करण्यात येईल.

कर्जदार नसलेला शेतकरी

शेतकऱ्यांनी जवळच्या बँकेच्या शाखेशी/पीएसीएस/ विमा कंपनीच्या अधिकृत माध्यमशी अंतिम मुदतीच्या तारखेच्या आत संपर्क साधून, विहित नमुन्यातील संपूर्ण प्रस्ताव-फॉर्म भरून, बँकेची शाखा/विमा मध्यस्थ/सीएससी यांचेकडे फॉर्म सादर करावा आणि आवश्यक प्रिमियमची रक्कम जमा करावी आणि त्यासोबत विम्यासाठी प्रस्तावित जमीन/पीक लागवडीतील त्याच्या विमायोग्य स्वारस्याचा दस्तऐवजांचा पुरावा सादर करावा. जारी केलेल्या कोणत्याही अधिसूचनेनुसार ठराविक राज्यातील आवश्यकतांनुसार शेतकऱ्यांना अतिरिक्त तपशील सादर करण्यास सांगितले जाऊ शकते.

संरक्षणाची इच्छा असलेल्या शेतकऱ्याने नियुक्त बँकेच्या शाखेत खाते उघडावे/चालवावे, आणि त्याचा तपशील प्रस्ताव प्रपत्रात द्यावा.

अधिसूचनेमध्ये घोषित केल्यानुसार विमा प्रस्तावाचे प्रपत्र केवळ निर्धारित अंतिम मुदतीच्या तारखेपर्यंत स्वीकारण्यात येईल.

शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रस्तावात जमिनीचा ओळख क्रमांक नमूद करावा आणि शेतजमिनीच्या ताब्याच्या संदर्भात दस्तऐवजाचे पुरावे द्यावेत. लागवड करणाऱ्याने पेरणी केलेल्या क्षेत्राचे पुष्टीकरण प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.